ब्रेकिंग न्यूज
Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला! 2 लाख खर्च केला अन् पांढऱ्या सोन्याची झाली माती, बीडच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी VIDEO पिंपरी-चिंचवडकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? सविस्तर Pakistan Cricket : 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ! 7 खेळाडूंची हकालपट्टी केल्यानंतर सिलेक्टरचा रा… पावसाने वाढवली चिंता, फुलोऱ्यातच सोयाबीनची फुलगळ आणि पानगळ, शेतकऱ्याचा खर्चही निघणं अवघड पुजेला अजून सामान लागेल, नवऱ्याला घराबाहेर पाठवलं, भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

Pakistan Cricket : 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ! 7 खेळाडूंची हकालपट्टी केल्यानंतर सिलेक्टरचा रा…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Pakistan Cricket News : गेल्या 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी टीमच्या एक दोन नव्हे तर सात खेळाडूंना डच्चू दिला गेला अन् मायदेशी परत बोलवलं गेलं. त्यानंतर आता पीसीबीने आणखी मोठा घाव घातला असून, पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या राष्ट्रीय निवड समितीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

कसोटी संघ आणि प्रशिक्षक वर्गात अचानक झालेल्या मोठ्या फेरबदलांनंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींमुळे संघात गोंधळ निर्माण झाला असून, मिस्बाहच्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतात नाट्यमय वळण मिळाल्याचं पहायला मिळतंय. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, मिस्बाहच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने पीसीबीला आपल्या निर्णयाबाबत स्पष्ट कल्पना दिली आहे.

औपचारिकपणे पद सोडण्यापूर्वी तो नोटीस कालावधी पूर्ण करणार आहे. क्रिकइन्फोनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून मिस्बाहने राजीनामा सादर केला असला तरी पीसीबीने तो अद्याप स्वीकारलेला नाही, असं नमूद केलं आहे. त्यामुळे आता पीसीबी कोणती अॅक्शन घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवड समितीचा सदस्य असूनही संघात इतके मोठे बदल करताना आपल्याशी कोणतीही चर्चा केली गेली नाही, असा आरोप मिस्बाहने केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याने हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम मॅच उर्वरित असल्याने पाकिस्तान संघातील हे अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. पीसीबीने मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमिर जमाल, मुहम्मद अवैस जफर आणि खुर्रम शहजाद यांची सुटका केली आहे. तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर पीसीबीने तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. त्यावरून आता वाद पेटला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर