ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विद्यापीठ स्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

114 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील शारीरिक शिक्षण विभागाद्वारे मारेगाव शहरामध्ये प्रथमच पुरुषांच्या विद्यापीठस्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

दि.16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या सदर स्पर्धेमध्ये एकूण 36 संघांनी सहभाग नोंदवला,ज्यामध्ये अंतिम सामना इंदिरा महाविद्यालय,कळंब विरुद्ध श्री.धाबेकर कला महाविद्यालय,खडकी (अकोला) यांच्यामध्ये खेळवण्यात आला, यात श्री.धाबेकर महाविद्यालयाने बाजी मारली.स्पर्धेच्या समारोपीय समारंभामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या हस्ते विजेत्या संघास विजय चषक देऊन संघास गौरविण्यात आले.



समारोपीय समारंभामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे सर बोलत असताना म्हणाले व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे.आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते.त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र क्रीडा विभागाने अत्यंत कुशलतेने हाताळले तसेच स्पर्धेत भाग घेणारे संघ ,त्यांचे खेळाडू ,उपलब्ध वेळ,साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजनपूर्वक यशस्वीपणे राबविण्याचे सर्व श्रेय महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.नितेश राऊत व इतर सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाते.

विविध महाविद्यालयातून स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाच्या शारीरिक शिक्षण संचालकांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धेविषयी बोलत असताना म्हणाले राहण्याची व जेवणाची सुविधा अत्यंत सुंदरपणे करण्यात आली व अशा स्पर्धा वारंवार महाविद्यालयात घेण्यात याव्यात आणि याचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य यांना जाते.
सदर स्पर्धा नियोजित वेळत पार पडण्यास पंच म्हणून निलेश झाडे, सतीश तेडेवार,निलेश तारक, किरण मडावी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली व महाविद्यालयाद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून सदर स्पर्धा अत्यंत चोखपणे यशस्वीरित्या पार पडली व सदर स्पर्धेस मारेगाव वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांची मेहनत कामी आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर