ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मार्डी येथील महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर विजयी

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील येथे न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या महिला संघाने विजेतेपद प्राप्त केले.

तर उपविजेतेपद जय भवानी महिला क्रीडा मंडल ढोरवासा यांनी तर तृतीय पुरस्कार संघर्ष क्रीडा मंडल नागपूर यांनी चतुर्थ पुरस्कार उडता हनुमान क्रीडा मंडल मुंबई यांनी पटकावीला.अंतिम सामान्यकरिता मॅन ऑफ दि मॅच चा बहुमान सुनीता बांगर या नागपूर संघाच्या महिला खेळाडूंने प्राप्त केला.

दि.31 जानेवारीला महिला व पुरुष कबड्डी सामन्याचे उदघाट्न झाले. या उदघाट्निय सामन्याचे उदघाटक युवक महिला काँग्रेस च्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनरावजी कासावार साहेब, आणि प्रमुख पाहुणे जेष्ठ नेते नानाजी पाटील खंडाळकर, पणन महासंघाचे संचालक नरेंद्र पाटील ठाकरे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर,

मार्डीचे सरपंच रविराजजी चंदनखेडे, पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, वसंत जीनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, हबीब खा पठाण, कुंभाचे सरपंच अरविंदजी ठाकरे, देविदासजी बोबडे, शांतीलालजी दुगड, यवतमाळ अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर, मारेगाव शहर अध्यक्ष शंकरराव मडावी साहेब ,अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस नगरसेवक आकाश भाऊ बदकी , वसंत जिनिंग संचालक अंकुश माफूर,चिचमंडळ उपसरपंच प्रफुलभाऊ विखणकर,

पोलिस पाटील प्रशांतजी पाटील, माजी सरपंच भास्करराव धानफुले, रामकृष्णजी चौधरी, श्रीमती तानेबाई सोयाम, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांगले, सुरज पंडीले, गणेश कनाके, छायाताई पुसाटे, शोभाताई कालर, मनीशाताई चौधरी, बेबीताई मोहूर्ले, मंगलाताई टिपले, माजी उपसरपंच प्रफुल झाडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेशराव देशपांडे, विजयजी धानोरकर, मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नाखले यांनी व आभार प्रदर्शन मारोती गौरकार यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर