बातमी ऐका (Marathi Voice Reader)
फक्त हिंदी आणि मराठी नाही तर अगदी साऊथ सिनेमातही आपल्या आवाजने छाप उमटवणारे नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, गोव्यात त्यांचं गुरुवारी पहाटे हार्ट अॅटॅकने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील नानाची वाडी इथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांची लोकप्रियता भारतात इतकीच जगभरात होती आणि अगदी पाकिस्तानमध्येही त्यांचे चाहते होते.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटरने नाना पाटेकर यांना व्हिडीओ शेअर करून आदरांजली वाहिली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. "एक उत्कृष्ट अभिनेते आणि त्याहूनही उत्तम माणूस" इंडियामध्ये जेवढे नानांचे चाहते होते, तेवढेच पाकिस्तानमध्येही त्यांचे फॅन आहेत. पाकिस्तानमधील लोकांना नानांचा अभिनय खूप आवडायचा. कोणताही सिनेमा असूदे अभिनयच असा करायचे की तो अगदी सहज केल्यासारखा वाटायचा, अगदी नॅचरल त्यामुळे त्यांचे फॅन होते. सकाळपासून ट्विटर पाहातोय, त्यांचे डायलॉग, त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून डोळ्यातले अश्रू काही थांबत नाहीत. अजूनही अश्रू येत आहेत. खूप वाईट झालं. खूप प्रेमळ माणूस होता, डाऊन टू अर्थ, त्यांचे फोटो व्हिडीओ पाहून खूप दु:ख होतं. ते आज आपल्यात नाहीत या गोष्टीचं.
View this post on Instagram
A post shared by SPORTSWOOD (@sportswood18)
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल आदरभावना व्यक्त केली. त्यांनी नानांचे वर्णन एक असाधारण अभिनेते आणि तितकेच अद्भुत व जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं. पाकिस्तानमध्येही त्यांच्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली होती. त्यांचे चाहते आहेत, पाकिस्तानी माजी क्रिकेटर्सना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी व्हिडीओ शेअर करून आदरांजली वाहिली.
View this post on Instagram
A post shared by SPORTSWOOD (@sportswood18)
नानांच्या पार्थिवावर रात्री उशिरा पुणे जवळील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंब, मित्र परिवार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी अत्यंत अश्रूपूर्ण नयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नानांची अंतिम झलक मात्र त्यांच्या अनेक चाहत्यांना पाहता आली नाही. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. नाना यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल असे अनेकांना वाटत होते. कुटुंबाने उशिरा रात्रीच अंत्यसंस्कार उरकून त्यांना अखेरचा निरोप दिला.