ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मनस्वी पिंपरे ची अभिमानास्पद कामगिरी

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

चेन्नई येथे सुरू असलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६१व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा मध्ये मुळगाव चींचोणी बोटोणी ता.मारेगाव जि. यवतमाळ सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिने (५ ते ७ वर्ष मुलीच्या वयोगटात) 200 मीटर स्पीड स्केटिंग रेस मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कांस्यपदक पटकावले.

मनस्वीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. वयाच्या सहाव्या वर्षी मनस्वी महाराष्ट्र राज्य टीम मधून खेळणे ही खुप मोठी झेप आहे.या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता संपूर्ण भारतातून 25 राज्यांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मनस्वीच्या वयोगटात एकूण 18 राज्याचे 36 प्रतिस्पर्धी होते.

मनस्वी कट्टर प्रतिस्पर्धी यांच्या वर मात करत 200 मीटर स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळविले.या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धे करिता गेल्या दोन महिन्यापासून मनस्वी स्वतः मेहनत करत असून तिचे प्रशिक्षक विजय मलजी सर यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय तिच्या आई वडीलानी अथक परिश्रम घेतले आहे.ती सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज,पुणे येथे स्केटिंग प्राशिक्षण घेत असून मारुती बधे मेमोरियल स्कूल कोंढवा बुद्रुक येथे शिकत आहे.

मनस्वीच्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धे करीता कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे सर व कोंढवा बुद्रुक येथील तनिष्का महिला ग्रुप आणि भैरवी सोशल फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर