ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

साई विद्यालयाचा फ्लोअरबॉलमध्ये दबदबा कायम

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विभागीय स्पर्धेत तिहेरी विजेतेपद; राज्यस्तरावर धडक

नितेश क्षीरसागर तालुका प्रतिनिधी कळंब

यवतमाळ, दि. 24 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या युवक व क्रीडा सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत श्री साई विद्यालय, लोहारा (ता. जि. यवतमाळ) यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपली परंपरा कायम राखली आहे.

या स्पर्धेत साई विद्यालयाच्या सतरा वर्षांखालील मुले व मुली तसेच एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघाने तिहेरी विजेतेपद पटकावले. या घवघवीत यशासह साई विद्यालयाच्या संघाने शालेय राज्यस्तरीय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर नुकत्याच पार पडलेल्या या विभागीय स्पर्धांमध्ये अमरावती विभागातील विविध संघांनी सहभाग नोंदवला होता.

मात्र साई विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध बचाव व आक्रमक खेळीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सतरा वर्षांखालील मुलांच्या संघात मयंक ठाकरे, आर्यन राठोड, वंश इंगळे, मयूर भारसाकळे, मयूर मडावी, अंश बाविस्कर, मिथिलेश बडे, रोहन कान्दे, प्रशील बेलखेडे, तन्मय डोईजड, संकेत राठोड, अनिकेत देवगडे, वेदांशू नामेकर व समर्थ ठाकरे यांचा समावेश होता.

सतरा वर्षांखालील मुलींच्या संघात माही साखरकर, अनुष्का ठोकळ, गौरी सकारापुरे, श्रावणी अढाव, प्रियंका वाघमारे, श्रावणी खटारे, रिया कुरसंगे, समृद्धी साखरकर, काजल गोडे, नीलम अंजले, अश्विनी गजभार, प्रतीक्षा कोठेकर, गुणगुण मडावी, साक्षी झोंबाडे व इशिका पेठे यांनी सहभाग घेतला.

एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघात अक्षरा भारसाकळे, चैताली भोयर, जान्हवी प्ररचाके, संध्या खटारे, ऋतुजा पुरी, समीक्षा कुरसंगे, दीपाली राऊत, कांचन कोल्हारे, प्रणाली साबळे, प्राजक्ता कांबळे, आराध्या राठोड, काजल जाधव व अश्विनी सारसे यांचा समावेश होता.

या यशासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब इंगोले, माजी मुख्याध्यापक मनोज इंगोले, मुख्याध्यापक अजय भटकर तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक जितेंद्र सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेनंतर विजयी खेळाडूंचा सत्कार स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी चैताली राऊत, सचिन हरणे, फ्लोअरबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अमोल बोदडे, उपाध्यक्ष मनोज येंडे, सहसचिव सचिन भेंडे यांच्यासह शिक्षक, पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर