ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अखेर क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

149 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यात तयार होणार नवीन क्रीडा संकुल

सुरेश पाचभाई मारेगाव,

तालुक्यातील रखडलेल्या क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मारेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली. तसेच त्वरित काम सुरू करण्याच्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू केल्याने अखेर मारेगावकरांनी मोकळा श्वास सोडलेला आहे.

मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न अधांतरीच होता.मागील अनेक वर्षापासून येथील क्रीडा संकुल काही कारणामुळे प्रलंबित होते. यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांमार्फत तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्फत प्रयत्न करण्यात आले. टाकळखेडा रोडवर नवीन वसतिगृहाचे बाजूला प्रस्तावित असलेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी 10 एकरची मागणी केली होती. त्यापैकी 5 एकर जागा मंजूर झाली आहे.

त्यासाठी एकूण रक्कम 5 कोटी मंजूर झाले आहे.
आणि या क्रीडा संकुलाचे त्वरित काम करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिले.अखेर क्रीडा संकुलाचा निधी मंजूर झाला असून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी चैताली लोखंडे, मनीष डोळसकर, तालुका क्रीडा संयोजक बंडू काकडे,धनराज ठेपाले उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर