ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


IND vs SL Test Mohammed Siraj : श्रीलंका म्हटलं की मोहम्मद सिराजच्या अंगात वेगळाच अवतार संचारतो अन् सिराज श्रीलंकेवर तुटून पडतो. याची झलक पहिल्या कसोटी सामन्यात देखील पहायला मिळाली. मोहम्मद सिराज नेहमीच आपल्या घातक बॉलिंगने फलंदाजांची झोप उडवताना दिसतो. मात्र, गॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या बॅटने सर्वांनाच थक्क केलं. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये सिराजने असं काही केलं की, स्टेडियममधील प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या.
पूर्ण ताकदीने बॅट फिरवली अन्…
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी मॅचमध्ये सिराज मैदानात आला अन् असं काही केलं की, मियाँने श्रीलंकेला टेन्शनमध्ये टाकलं. सिराजने क्रीझवर पाऊल ठेवताच आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले होते. टीम इंडियाचे 7 बॅटर 432 वर आऊट झाल्यानंतर धावांचा वेग वाढवण्यासाठी त्याला मैदानात पाठवण्यात आलं होतं. त्याने डावाच्या चौथ्याच बॉलवर खाली झुकत पूर्ण ताकदीने बॅट फिरवली. स्पिनर केशरा नुवान्थाच्या बॉलवर मारलेला हा जोरदार स्लोग-स्वीप डीप मिडविकेटच्या वरून बाउंड्रीच्या खूप बाहेर जाऊन पडला अन् सिराजच्या खणखणीत सिक्सने स्टेडियम फुलून गेलं.

D.S.P. = Delivering Sixes Professionally.
Mohammed Siraj has his batting license renewed!

Watch #SLvIND 1st Test Day 2, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/iHZugEaZXm

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 16, 2026

टेस्ट करिअरमधील फक्त चौथा सिक्स
आपल्या या छोट्याशा इनिंगमध्ये सिराजने फक्त 15 बॉल्स खेळत 11 धावा केल्या, पण त्याने मारलेला हा एकमेव सिक्स सध्या प्रचंड चर्चेत आहे. जवळजवळ 50 कसोटी सामने खेळणाऱ्या सिराजच्या बॅटमधून आलेला हा त्याच्या टेस्ट करिअरमधील फक्त चौथा सिक्स ठरला. त्यानंतरही त्याने काही मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला त्यात यश आले नाही. एका बाजूने मोठे फटके मारून स्कोरबोर्ड वेगाने हलवण्याच्या प्रयत्नात असताना श्रीलंकेचा फास्ट बॉलर असिथा फर्नांडोने त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. असिथाच्या बॉलवर आऊट होत सिराज माघारी परतला आणि भारताला 8 वा धक्का बसला.
मियाँभाईचा जलवा 
दरम्यान, तुम्हाला आठवत असेल तर मोहम्मद सिराजने सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन गगनचुंबी सिक्स मारत सर्वांना चकित केलं होतं. अशातच आता तोच जलवा मियाँभाई कसोटी सामन्यात दाखवताना दिसला. जरी सिराज मोठी इनिंग खेळू शकला नसला, तरी त्याची ही छोटी आणि आक्रमक खेळी चाहत्यांचे मनोरंजन करून गेली. बॉलिंगमध्ये नेहमीच तुफान आणणारा सिराज आता गरज पडल्यास बॅटनेही सिक्स मारू शकतो, हेच त्याने या शॉटमधून दाखवून दिलंय.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर