ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कळंब अंबिका नगर येथे ग्रामसेवक युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नितेश क्षीरसागर | कळंब तालुका प्रतिनिधी

कळंब : येथील अंबिका नगर वॉर्ड क्रमांक १७ परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका ग्रामसेवक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचे नाव प्रतीक संतोष इंगळे (वय २७, रा. चांदूरबाजार) असे असून ते सध्या शेडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. कळंब येथील अंबिका नगर भागात ते एका घरी भाड्याने राहत होते. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस करीत आहेत. तरुण व होतकरू ग्रामसेवकाच्या अकाली मृत्यूमुळे प्रशासनासह मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर