ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

डॉक्टरची सिनेस्टाईलने लूटमार करणारे आरोपी मारेगांव पोलिसांच्या ताब्यात.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

*रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरची केली होती लुट.

सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्षे हे प्रॅक्टिस करून घरी येत असताना रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून त्यांचे कडून पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या लुटारूंना आज आदिलाबाद येथुन मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्ष हे प्रॅक्टिस करून दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजता सुमारास नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात चार लूटारूंनी त्यांची स्कुटी अडवून बंदुकीच्या व चाकूच्या धाकावर त्यांना कारमध्ये कोंबून सोन्याची अंगठी,चेन सह रोख 2.5 लाख असा ऐकुन सुमारे चार लाख रूपये कीमतीचा ऐवज लुटत डॉक्टरांणा वणी पासून काही अंतरावर सोडुन पोबारा केला होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सर्वत्र सूचना देऊन नाकेबंदी केली होती.तेलंगणा पोलिसांनी अदिलाबाद येथे नाकाबंदी केली होती त्याच वेळी लुटारूंची गाडी तेथे पोहोचली,पोलिसाचे वाहन दिसताच,हे लुटारू त्या ठिकाणावरून पळकाढला पण त्या गाडीतील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

व तिघेजण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.त्यांना पण झाशी येथुन अटक करण्यात आली होती.अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकते का,या दृष्टीने त्यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून अदिलाबाद पोलिसांच्या ताब्यातिल आरोपी तेथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या 4 आरोपींना आज मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सादर आरोपीची स्थांनातराची कारवाई ठाणेदार राजेश पुरी,पोहवा आनंद अलचेवार,नापोका.अजय वाभीटकर,रजनीकांत पाटील, चासफो. प्रमोद जिद्दीवार यांनी पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर