बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: प्रोजेक्ट करायचं असल्याचं सांगून एका नराधम चुलत्याने सहावीत शिकणाऱ्या पुतणीला घरी बोलावलं. तिला मिठाई आणि सफरचंद खायला दिले आणि डोळ्यांवर पट्टी बांधून लैंगिक अत्याचार केले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून हा अत्यंत घृणास्पद आणि नात्याला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चंदगड पोलिसांत चुलत्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहावीत शिकणाऱ्या मुलीला प्रोजेक्ट करायचे आहे, असे सांगत चुलत्याने पुस्तक घेऊन घरी बोलावून घेतलं. त्यानंतर तिला मिठाई खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी तत्काळ चंदगड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
आई-वडील रात्री ऊसतोडणीला गेलेले, मागे तीन वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, श्वास गुदमरला अन्… कोल्हापुरात हळहळ!
चंदगड पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तातडीने सूत्रे हालवली. आरोपी चुलत्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपासणीसाठी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेनं अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ओळखीच्या आणि जवळच्या नात्यातील व्यक्तींकडूनच असे प्रकार घडत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.