ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे शंकर किसन आत्राम (वय अंदाजे  ४३ वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता उघडकीस आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शंकर आत्राम हे मिस्त्री काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पिसगाव परिसरातील पाहपळ रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

आत्राम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विना तोडसे पोलिस कॉन्स्टेबल कपिल जीवने करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर