ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले,लग्नाचे फोटो मोबाईलवर पाठवले

2.8k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना मारेगाव तालुक्यात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी ही मारेगाव तालुक्यातील असुन.ती नेहमीप्रमाणे दि.28 तारखेला घरच्यांसोबत होती.दि. 29 मार्चला सकाळी 7 वाजता उठल्यावर बहीण घरी दिसून आली नाही.म्हणून भावाने तिची घरी तसेच सभोवताल सगळीकडे शोधाशोध केली असता ती कोठेही दिसून आली नाही.

तसेच नातेवाईकांना बहिणीबद्दल फोन करून विचारले असता ती नातेवाईकांकडे सुद्धा मिळून आली नाही. बहिण कोठेच आढळून न आल्याने शेवटी भावाने मावशीच्या मुलाला फोन केला असता मावस भावाने सांगितले की ती माझ्याकडे नाही परंतु तिच्या लग्नाचे फोटो मात्र माझ्या मोबाईलवर कोणीतरी पाठवलेले आहे.

मुलीचे फोटो बघताच मुलीच्या भावाच्या लक्षात आले की आपला नात्यातीलच एका 22 वर्षीय मुलाने आपल्या अल्पवयीन 17 वर्षे 6 महिन्याची असल्यामुळे बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव व मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर