ब्रेकिंग न्यूज
Antarwali Sarati News | अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक ताब्यात! काय घडलं? Sreesanth Sanju Samson Controversy : हँडशेक सोडा, एकमेकांकडं बघितलंही नाही! संजू सॅमसन अन् श्रीसंत यांच्यात… पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गावात बांधला ‘सोन्या’चा बंगला, Video पाहाल तर कौतुकच कराल! Sambhajinagar: लग्नानंतर पतीची भयंकर डिमांड, निकितानं आईला फोन केला अन्… छ. संभाजीनगरात स्मशानभूमीच राडा Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi
SP News Maregaon

Sambhajinagar: लग्नानंतर पतीची भयंकर डिमांड, निकितानं आईला फोन केला अन्… छ. संभाजीनगरात स्मशानभूमीच राडा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल 12 लाख रुपये खर्च केले. मात्र, लग्नाला अवघे पाच महिने होत नाहीत तोच चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा छळ सुरू झाला. पतीकडून मारहाण आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून निकिता ऋषिकेश वाकळे (वय 23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सुरेवाडी, जाधववाडी येथे घडली. आत्महत्या करण्यापूर्वी निकिता यांनी आईला फोन करून ‘तुझी काळजी घे,’ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर निकिता यांच्या अंत्यविधीच्या वेळी हडको एन-11 येथील स्मशानभूमीत माहेर आणि सासरच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. आरोप-प्रत्यारोप वाढल्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली आणि दगडफेकही करण्यात आली. उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

भुरटा चोर ते ‘समृद्धी’वरचा दरोडेखोर, YouTube वर स्टोरी बघायचा, AI वापरायचा अन्… परशुराम गायकवाडचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले!

निकिता यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे (26), सासू रेखा सोमीनाथ वाकळे, सासरे सोमीनाथ कचरू वाकळे (53), दीक्षा तांबे (29), दीर सुमित सोमीनाथ वाकळे (20), अनिता दामोदर पवार (35) आणि मंदा हरिदास दारकुंडे (33, सर्व रा. सुरेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ऋषिकेश वाकळे याला ताब्यात घेतले आहे.

निकिता यांचे वडील गणेश अर्जुन पठारे हे बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांचा चार ते पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्यांनी मोठा खर्च केला होता. त्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून निकिताला त्रास देण्यास सुरुवात झाली. चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, अशी मागणी पती ऋषिकेश तिच्याकडे करत होता.

लग्नात आधीच मोठा खर्च झाल्याने निकिताने माहेरून आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ऋषिकेशने तिच्यासोबत मारहाण केली, तर घरगुती कारणांवरून सासरच्या अन्य मंडळींकडूनही तिचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा त्रास वाढत गेल्याने निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

निकिता या मूळच्या देव पिंपळगाव येथील रहिवासी असून त्या बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. त्यांचा विवाह जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश वाकळे याच्याशी झाला होता. ऋषिकेश हा शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात ‘ब्रदर’ म्हणून नोकरी करतो. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच निकिताला सासरच्यांकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, निकिताच्या भावाने तिच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचाही आरोप केला आहे. या सर्व कारणांमुळे निकिता तणावात होती. बुधवारी रात्री तिने आईला फोन केला. या वेळी ‘तुझी काळजी घे,’ असे सांगून तिने फोन ठेवला. त्यानंतर शनिवारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर