ब्रेकिंग न्यूज
Antarwali Sarati News | अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक ताब्यात! काय घडलं? Sreesanth Sanju Samson Controversy : हँडशेक सोडा, एकमेकांकडं बघितलंही नाही! संजू सॅमसन अन् श्रीसंत यांच्यात… पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गावात बांधला ‘सोन्या’चा बंगला, Video पाहाल तर कौतुकच कराल! Sambhajinagar: लग्नानंतर पतीची भयंकर डिमांड, निकितानं आईला फोन केला अन्… छ. संभाजीनगरात स्मशानभूमीच राडा Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi
SP News Maregaon

पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गावात बांधला ‘सोन्या’चा बंगला, Video पाहाल तर कौतुकच कराल!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर – शिंगांची रुबाबदार ठेवण, चाणाक्ष कान, चपळता आणि आकर्षक शरीरयष्टीच्या जोरावर ‘सोन्या’ने प्रत्येक प्रदर्शनात परीक्षकांचे मन जिंकले. या बैलाची ख्याती ऐकून शौकिनांनी व व्यापाऱ्यांनी तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत बोली लावली. मात्र, एखाद्याने ‘थार’ गाडी देण्याची तयारी दर्शवली तरी सोन्या बैलाला विकणार नाही; तो आमच्या घराचा सन्मान आहे," असं मालक गणपत खपाले यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.

पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा

सध्याच्या यांत्रिक युगात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतीतील बैल जोड्यांचे प्रमाण घटत आहे. मात्र, पंढरपूर तालुक्यातील गणपत खपाले या शेतकऱ्याला खिल्लार बैल पाळण्याचा छंद लागला आहे. आता त्यांच्या एका खिल्लार बैलाने संपूर्ण महाराष्ट्रात आपला वेगळा दरारा निर्माण केला आहे. खपाले यांनी पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेल्या ‘सोन्या’ नावाचा खिल्लार बैल विविध प्रदर्शनांमध्ये सलग 11 वेळा चॅम्पियन ठरला आहे.

भीमा नदीच्या काठचं हे ऐतिहासिक गाव, तब्बल 11 महिने चाल होता दिल्लीचा कारभार, औरंगजेबाच्या काळात काय घडलं? VIdeo

​’सोन्या’च्या बळावर कुटुंबाची प्रगती

कधीकाळी घरात साधी सायकल होती. शेतीला जोडधंदा म्हणून जर्शी गाय पाळत होतो. परिस्थिती अगदी जेमतेम होती. घरी एक देशी गाय होती. त्यानंतर बैल घेतला आणि आमचं भाग्य बदललं. मग, बैल पाळण्याचा नाद लागला. हे बैल वेगवेगळ्या स्पर्धा जिंकायला लागले. हिंदकेसरी झाले. त्यामुळे आमची परिस्थिती देखील सुधारत गेली. दोन मुलांना इंजिनिअर बनवलं. एक मुलगी मुंबई पोलीस झाली. भावाची मुलं देखील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदांवर गेली. एवढी सगळी प्रगती बैलांमुळेच झाल्याचं खपाले सांगतात.

गावात एक कोटीचा बंगला

‘सोन्या’ आणि इतर बैलांमुळे आमचे दिवस बदलले. आता गावात 1 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्याचे काम सुरू आहे. या बंगल्यावर आम्ही बैलजोडीची प्रतिकृती उभारणार आहोत. याला 3-4 लाखांपर्यंत खर्च येईल. पण या बैलांमुळे आमची महिन्याची 2-3 लाखांपर्यंत आहे. त्यांनीच हे चांगले दिवस दाखवले. त्यामुळे जोपर्यंत बैल आहेत, तोपर्यंत कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळणार आहे. त्यांना कधीच विकणार नाही, असंही खपाले म्हणतात.

दरम्यान, केवळ शेतीपुरता विचार न करता देशी खिल्लार जातीचे संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने खपाले यांनी हा छंद जपला आहे. सध्या ‘सोन्या’ आणि इतर बैलांना पाहण्यासाठी खपाले यांच्या घरी शौकिनांची मोठी गर्दी होत असून ग्रामीण भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर