ब्रेकिंग न्यूज
कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी? Babar Azam : ‘माझ्यासाठी देखील ही न्यूज होती…’, 7 खेळाडूंच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्… सोशल मीडियावरील Video पाहिला, नवीन पद्धतीनं केली दोडका शेती, लाखात झाला नफा मुंबईतून कोकणचा प्रवास सोपा, आता रोज धावणार CSMT-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, वेळापत्रक, थांबे आणि संपूर्ण माह… Sachin Tendulkar : ‘मी बाप्पासाठी…’, मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीचं कारण काय? सचिन तेंडूलकरची पहिली प्र…
SP News Maregaon

Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Businessman Vineet Manocha Murder Daughter in Law : प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि औषध विक्रेते विनीत मनोचा यांच्या हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात विनीत मनोच्या यांच्या सूनबाईनेच त्याच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी तिने घरातल्या नोकराला हाताशी घेऊन हा सगळा घटनाक्रम घडवून आणला होता.पण आता या प्रकरणात सर्वांत मोठा खुलासा समोर आला आहे. सूनबाईने करोडपती सासरा विनीत मनोचाला मारण्यासाठी तब्बल तीन प्लान रचले होते. A,B आणि C असे हे तीन प्लान होते. यातला पहिला प्लान फ्लॉप ठरला तर दुसरा नाहीतर तिसरा अशी मास्टरमाईंड लेव्हली योजना सुनेने तयारी केली होती. या सगळ्या प्लानचा उलगडा आता पोलिसांनी केला आहे.

डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, सुनेने बनवलेला प्लान ए हा घराच्या बाहेर होता. यामध्ये रस्त्यात विनीत मनोजा यांच्या गाडीला टक्कर देऊन त्यांची हत्या करण्याचा प्लान होता. पण या प्लानला सुपारी किलर विशालने नकार दिला होता.कारण विनीत मनोजा यांच्या गाडीला टक्कर मारण्याच्या नादात त्यांच्याही जिवाला धोका होता. तसेच जर अपघातात पकडले गेलो तर अडकण्याची भीती होती. त्यामळे त्यांनी प्लान A वर काम करण्यास नकार दिला.

त्यानंतर प्लान B मध्ये घरात शिरून उशीने तोंड दाबून हत्या करण्याचा प्लान होता. त्यानंतर सासरा मेल्यावर हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला असे त्यांची सूनबाई सांगणार होती, जेणेकरून कुणावरही संशय जाऊ नये.

प्लान B फेल कसा झाला?
सुपारी किलरने विशालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,प्लान B जर फेल ठरला तर प्लान C वर काम करायचं होतं. त्यानुसार आरोपी चाकू घेऊन घरात शिरलेले. त्याचवेळी 9.36 वाजता सूनबाई शालु आपल्या नवरा सुब्रत आणि मुलगा श्रीजय सोबत घराबाहेर पडली. त्यानंतर बरोबर 8 मिनिटांनी म्हणजे 9.44 ला दोघे सुपारी किलर डुप्लिकेट चावीच्या मदतीने फ्लॅटमध्ये शिरले.

प्लाननुसार दोघे सरळ शालुच्या खोलीत शिरले आणि बिझनेसमन विनीज मनोजाची वाट पाहत बसले. दोघांनी खोलीची दरवाजा हलकासा खुला ठेवला, जेणेकरून बाहेरच्या गोष्टीवर नजर ठेवता येईल आणि खोलीची लाईटही बंद केली होती. विशेष म्हणजे आरोपींनी दरवाजाचा हँडल देखील पकडून ठेवला होता कारण त्यांना भीती होती की विनीत मनोचा येऊन दार बंद करतील आणि दोघेही आत अडकून पडतील.

जवळजवळ 74 मिनिटांनी विनीत मनोचा यांनी घराचा दरवाजा उघडला आणि ते आत आले. त्यांनी पहिल्यांदा कपडे बदलले आणि जेवण केलं.त्यानंतर फ्रिजमधून मिठाई खाल्ली आणि पाणी प्यायले. पण याचवेळी त्यांची नजर सुनेच्या खोलीवर पडली जिचा दरवाजा थोडासा खुला होता. त्यामुळे त्यांना वाटलं मांजर आत शिरले आहे. त्यामुळे ते रुमकडे गेले आणि लाईट चालू केली आणि मोठा गेम झाला.

लाईट चालू केल्यानंतर विनीतला दोघे दिसले,त्यांनी त्याला विचारलं तुम्ही इथे काय करताय, तेव्हा विशालने चाकुने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली.विनीत जमीनीवर पडल्यावर त्यांची हार्टबिट चेक करून दोघेही घराबाहेर पडले आणि वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले.

फ्लॅटमध्ये शिरल्याबरोबर तु्म्ही कॅमेरात कैद झाला, त्यामुळे खुन करून तुम्ही कसे सुटू शकला असतात,असा प्रश्न पोलिसांनी आरोपीला विचारला होता.यावर आरोपी म्हणाले, आम्ही तर उशी दाबून मारण्याचा प्लान केला होता,त्यात पकडले जाण्याची शक्यता कमी होती.कारण शालु त्यांना हृदयविकाराच झटका आल्याचा बहाना करणार होती.त्यामुळे असे झाल्यास कॅमेरा तपासण्याचा प्रश्नच येणार नव्हता.त्यामुळे ते हमखास सुटले असते,असा त्यांचा दावा होता.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर