ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थिनीचा पाठलाग करत तिला रस्त्यालगतच्या झाडीमध्ये ओढत लैंगिक अत्याचाराची घटना मुलुंडमध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी जवळपास 250 हून अधिक सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताचा माग घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल रामचरण करोटिया (39) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील सी.पी. तलाव परिसरात राहणारा आहे.

नेमकं काय घडलं?

8 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एक तरुणी शिक्षणासाठी जात होती. यावेळी मुलुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला. संधी साधून तिचा पाठलाग करून तिला रस्त्यालगतच्या झाडीमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. झटापटीनंतर तरुणीला दुखापत झाली. आरोपीच्या तावडीतून सुटका होताच तरुणीने घर गाठून घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध 6 तपास पथके तयार केली. घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील 120 तासांच्या फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपीचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी तपास पथकास घटनास्थळ परिसरात संशयास्पद हालचाल करणारा तसाच संशयित आढळून आला. तो तेथून निघून गेल्यानंतर त्याच्या हालचालींच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा माग काढण्यात आला. त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी घटनास्थळ परिसरात यापूर्वीही वारंवार येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या विकृताने अशाच प्रकारचा त्रास, छेडछाड अथवा लैंगिक स्वरूपाचा गैरप्रकार झाला असल्यास संबंधित महिला/तरुणींनी मुलुंड पोलीस किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर