ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

विहिरीत उडी घेऊन 36 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या

2.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मांगरूळ येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

गावाजवळील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली.गोपाल मधुकर ठाकरे वय 36 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील राहिवासी होता.

गोपाल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. गोपाल हा वडिलांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करीत होता. व स्टाईलचे मिस्त्री काम करत होता.आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोज रविवारला 3 वाजताच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मृतक गोपाल यांचे पश्चात आई, वडील, पत्नी ,मुलगी व चार विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंतत्याचा मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली ए.एस.आय किसन शुंकुरवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर