ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महसूल विभागाची रेती तस्करावर कारवाई

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भालेवाडी येथे हायवावर कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,

अवैध मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या हायवावर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली.तालुक्यातील भालेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच काल बुधवारच्या मध्यरात्री ट्रॅक्टर व हायवा वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.

काल मध्यरात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला हायवा काल मार्डी ते मारेगाव मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-34 AV 0079) हे अवैध वाहन भालेवाडी येथे पकडण्यात आले. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला हायवा तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

ही कार्यवाही तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी एस सी कुळमेथे,तलाठी व्ही बी सोयाम, गजानन वानखडे, मंगेश बोपचे,विजय किनाके यांनी केली.परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर