ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

चोपण येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील एकाच दिवशी दोन आत्महत्या पहिली म्हैसदोडका तर दुसरी चोपण येथे सतच्या आत्महत्येने संपूर्ण तालुका हादरला आहे पण प्रशासणा कडून आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याच ठोस उपाय योजणा केल्या जात नाही.

चोपण येथील शेतकऱ्याने नापिकी आणि जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोज मंगळवारला सायंकाळच्या 5 सुमारास घडली.

सचिन विठ्ठल ढोरे वय सुमारे 36 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून सचिन हा काही दिवसापासून चिंतेत होता अशी माहिती कुटुंबियांन कडून प्राप्त झाली आहे. त्याच्या नावाने 3 एकर शेती आहे. व तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच करत होता. पण यावर्षी पडलेला अती वृष्टी व ओला दुष्काळ आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली सततच्या नापिकी यामुळे तो आणि कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटलेले होते.

अशातच आलेल्या नैराश्यातून सचिनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.सचिन हा घरून 4 वाजता सुमारास शेताकडे जायला निघाला.शेतात गेल्यानंतर त्याने शेतात फवारणीसाठी आणलेले मोनोसील नावाचे कीटकनाशक प्राशन केले आणि कानडा जंगलाजवळ असलेल्या शेताकडे गेला.

सायंकाळ झाली तरी तो घरी न आल्याने घरच्यांनी आणि शेजारी व मित्रमंडळींनी त्याचा शोधा शोध घेतला असता त्याचा थांगपत्ता लागला नाही.शेवटी मित्रानी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला. तो कानडा जंगलामध्ये मृतावस्थेत पडलेला होता.

सचिनच्या पाठी मागे आई,वडील,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा अप्तपरिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार सुरेंद्र टोंगे, विनेश राठोड करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर