ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथील लूटमार प्रकरणातील
चार संशयित मारेगाव पोलिसांच्या ताब्यात.

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चारही संशयितांना 31 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी.

सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्ष हे प्रॅक्टिस करून दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताचे सुमारास नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ सिनेस्टाईलने लूटमार करून त्यांचेकडून सोने हिसकावले, नगदी रोख रक्कम लुटली व वरून तीन लाखाची खंडणीही वसूल केली होती.

मारेगाव पोलिसांनी शिताफिने आपल्या ताब्यात घेत मोठा दरोडा टाकणाऱ्यास जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
डॉक्टरला लूटमार प्रकरणाने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.पण घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एका वेगळ्या प्रकरणाशी निगडित तेलंगणा राज्यातील आदिलाबाद पोलिसांनी काही आरोपींना आदिलाबाद व झाशी येथून ताब्यात घेतले होते.

त्या चार संशयित आरोपींची लिंक डॉक्टर हाजरा सीनेस्टाईल लूट प्रकरणाशी जुळून असल्याचे लक्षात येताच मारेगाव पोलिसांकडून त्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आला होता.अदिलाबाद पोलिसांच्या ताब्यातिल आरोपी तेथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज दिनांक 25 मार्च 2023 रोज शनिवारला त्या 4 संशयित आरोपींना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

संशयित आरोपी मोहम्मद अर्शद अब्दुल्ला वय 30 वर्ष मस्जीद ईमाम (शिक्षक) रा.ग्राम जीराहीरा ता.पाहारी जी.भरतपुर (राजस्थान ) ,जाकीर खान हासनी वय 30 वर्ष, मुजाहीद खान ईद्रीस वय 26 वर्ष,मुस्ताक खान प्रताप वय 24 वर्ष ,तीन संशयित आरोपीं रा.ग्राम हाथीया ता.छाता जि. मथुरा (उत्तरप्रदेश) अशी लूट प्रकरणातील संशयितांची नावे असून सध्या हे चारही संशयित मारेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.

मारेगाव पोलिसांनी चारही संशयितांना पुढील 7 दिवसासाठी रिमांड वर घेतले असून अद्याप चारही संशयीतांकडून तो गुन्हा कबूल करण्यात आला नाही.पोलिसी खाक्या व बाजीराव वरच पुढील बाबी अवलंबुन असणार आहे.सदर आरोपीची स्थांनातराची कारवाई ठाणेदार राजेश पुरी,पोहवा आनंद अलचेवार,नापोका.अजय वाभीटकर,रजनीकांत पाटील, चासफो. प्रमोद जिद्दीवार यांनी पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर