बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Sreesanth Sanju Samson KCL Final Video : टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. झिम्बॉब्वेविरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीजमधून त्याला आराम देण्यात आला होता. तो आता थेट अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसेल. अशातच संजू क्रिकेटपासून मात्र लांब गेला नाही. केरळमध्ये सुरू असलेल्या केरला क्रिकेट लीगची फायनल पाहण्यासाठी तो आता होता. त्यावेळी केरळचा आणखी एक स्टार बॉलर एस श्रीसंत देखील तिथंच होता. अशातच यावेळी असं काही घडलं की, सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
श्रीसंतने संजूसोबत हँडशेक केला नाही
झालं असं की, केरला क्रिकेट लीगची फायनल झाली. त्रिशूर टायटन्सने कालिकत ग्लोबस्टार्सचा चार गडी राखून पराभव करत केरळ क्रिकेट लीग (KCL) च्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना जिंकला. यानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन सेरेमनी पार पडली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजू सॅमसन स्टेजवर होता. यावेळी मॅच पाहण्यासाठी श्रीसंतने देखील हजेरी लावली होती. जेव्हा श्रीसंतला स्टेजवर बोलवलं गेलं. त्यावेळी श्रीसंतने स्टेजवर आल्यावर संजूसोबत हँडशेक केला नाही.
Any problems between
There seems to be some talk about a possible ego clash following Sreesanths recent interview.
Only they know whats really happening #SanjuSamson @BCCI pic.twitter.com/ndNri2Tabm
— Morvin Edward (@morvinedward) September 6, 2026
मागील वर्षी झालेला वाद कारणीभूत?
श्रीसंतने संजूकडे पाहिलं देखील नाही. श्रीसंत तसाच पुढे इतर पाहुण्यांकडे पाहून निघून गेला. तर संजूने आपले हात मागे बांधले होते. त्याने देखील हात सोडले नाही अन् त्याने देखील श्रीसंतकडे पाहिलं नाही. यावरून अनेकांचे डोळे चक्रावले. मागील वर्षी झालेला वाद तर यास कारणीभूत नाही ना? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. संजू सॅमसनने मागल्या वर्षी याच केरला क्रिकेटमध्ये लीगमध्ये धमाका करत टीम इंडियातील स्थान पक्कं केलं होतं. आता तो गेस्ट म्हणून याच लीगमध्ये दिसला.
मागच्या वर्षी काय घडलं होतं?
संजू सॅमसनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे एस श्रीशांतचे संबंध इतके बिघडले आहेत की, केरळ क्रिकेट असोसिएशनने त्याला मागच्या वर्षी पुढील तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं. विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघात संजू सॅमसनचा समावेश नव्हता. या संदर्भात, श्रीशांतने म्हटले होते की, याच कारणामुळे संजू सॅमसनची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड होऊ शकली नाही. केसीएने या प्रकरणाची दखल घेतली आणि माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित केलं. त्यानंतर दोन्ही खेळाडूंचे संबंध ताणले गेले आहेत.