बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Nigar Sultana step down as Bangladesh captain : वुमेन्स टीम इंडियाने श्रीलंका वुमेन्सचा पराभव करून आशिया कपची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मोहसिन नक्वीमुळे ट्रॉफी मिळाली नसली तरी देखील टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत कमालीचं प्रदर्शन केलं अन् आता ट्रॉफीवर नाव कोरलंय. अशातच आता सेमीफायनलचा पंगा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वुमेन्स टीम इंडियाशी पंगा घेणं बांगलादेशच्या कॅप्टनला भारी पडलं आहे.
कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागणार
आशिया कपमध्ये बांगलादेशचं नेतृत्व केलेल्या निगार सुलताना हिला बांगलादेश महिलांच्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. ‘क्रिकबझ’ला मिळालेल्या माहितीनुसार, बॅटिंग आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याबाबत सुलतानाने बीसीबीला कळवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाशी पंगा बांगलादेशला भारी पडला आहे. पण सेमीफानयलमध्ये असं काय घडलं होतं? जाणून घ्या.
Sunil Gavaskar : सचिन तेंडूलकरला क्रिकेट बोर्डावर घ्या, गावस्करांनी दिला BCCI ला सल्ला, ‘या’ सहा दिग्ग्जांची नावं पाठवली!
सेमीफानयलमध्ये असं काय घडलं होतं?
वुमेन्स एशिया कप 2026 च्या सेमीफायनल सामन्यादरम्यान टॉसवेळी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. या मॅचमध्ये बांगलादेशची कॅप्टन निगार सुल्ताना हिने भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौर हिच्यासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या घटनेनंतर क्रिकेट जगतात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं असून, हा निर्णय पूर्णपणे निगार सुल्तानाचा वैयक्तिक होता, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
बीसीबीची कोंडी
दरम्यान, या सामन्यानंतर निगार सुल्तानाच्या कल्पकतेवर आणि वर्तनावर बोर्डातूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एशियन गेम्समधील कामगिरी आणि तिच्याविरोधात आलेल्या तक्रारींनंतर तिच्या कॅप्टनशीपबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बीसीबीने स्पष्ट केले होतं. अशातच आता बोर्डाच्या इंटरनल आदेशानंतर सुल्तानाने आपली कॅप्टन्सी खाली ठेवली आहे.