ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

स्केटिंगपटू मनस्वी पिंपरेला खा.सुप्रियाताई सुळे यांची अनोखी मदत

921 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोटोनी सध्या राहणार कोंढवा बु.पुणे येथील सात वर्षीय हिंदरत्न कु.मनस्वी विशाल पिंपरे ही आंतरराष्ट्रीय स्केटिंग पटू आहे.

हिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य 24 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले असून,विविध स्केटिंग स्पर्धामध्ये 114 गोल्ड मेडल,17 विविध स्तरावरील पुरस्कार आणि नॅशनल स्केटिंग चॅम्पियन अशा स्केटिंग मधील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनस्वीला भविष्यात स्केटिंग मधुन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी Inline Skate गरजेचे आहे.

परंतु मनस्वीचे वडील स्वतः एका पायाने अपंग असुन पुणे येथे छोटासा व्यवसाय करतात आर्थिक बाजू जेमतेम असून तीच्या स्केटिंग खेळाकरीता आर्थिक खर्च खुप जास्त आहे,हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांनी मनस्वीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक लाख 30 हजार रु. किमतीचे Inline Skate Kit मदत म्हणून देण्यात आले, त्याकरिता पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वतीने हे स्केट पुणे येथे त्यांच्या स्व:हस्ते मनस्वीला देण्यात आले.

येणाऱ्या 2026 या वर्षात मनस्वी राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मनस्वी स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे.येणाऱ्या काळात एशियन गेम्स,  जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप असेच ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमधून भारतासाठी सुवर्णपदके मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर