ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune Accident : कॉलेजला निघालेल्या ७-८ विद्यार्थिनी; बसची वाट बघत असतानाच अंगावर धावून आला काळ, भरधाव कारनं… ✦ ⚡ बुरांडा–खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका! ✦ ⚡ मार्डीच्या ‘न्यू युवा समता दुर्गोत्सव मंडळा’चा सामाजिक संदेश देणारा उपक्रम; विसर्जन मिरवणुकीतून पोलिसांच्या कार्याला सलाम! ✦ ⚡ चिंचाळ्यात ‘जय दुर्गा माता महिला मंडळा’चा विविध उपक्रमांतून सामाजिक एकतेचा जागर! ✦ ⚡ 230 झाडांची केली यशस्वी लागवड, 7 लाख रुपयांचा नफा, सोलापुरातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ✦ ⚡ सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ SA vs AUS : स्मिथचा कॅच हवेत, ब्रीट्झके धावला पण बऊमाने तोंड फिरवून हे काय केलं? आफ्रिकेच्या सनसनाटी विजयाच… ✦ ⚡ पुणेकरांच्या खिशाला कात्री, खासगी आणि स्कूल बसचा प्रवास महागणार, कितीने दर वाढणार? ✦ ⚡ दुष्काळात अमरावतीच्या शेतकऱ्यानं कमाल केली, सोयाबीनसाठी टोकण पद्धत ठरली फायद्याची, मिळालं 26 क्विंटल उत्पन्… ✦ ⚡ अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत!
SP News Maregaon

SA vs AUS : स्मिथचा कॅच हवेत, ब्रीट्झके धावला पण बऊमाने तोंड फिरवून हे काय केलं? आफ्रिकेच्या सनसनाटी विजयाच…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय झाला आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आलेला असतानाही दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर तीन दिवसांमध्येच इनिंग आणि 31 रननी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा आणि मार्को यानसन या सनसनाटी विजयाचे शिल्पकार ठरले.

110 रनवर दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावल्या होत्या, पण टेम्बा बऊमाने खालच्या क्रमांकाच्या बॅटरना घेऊन खिंड लढवली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 425/9 पर्यंत नेला आणि डाव घोषित केला. बऊमाने 179 रनची झुंजार खेळी केली, तर मार्को यानसनने 85 आणि सिमन हार्मरने 82 रन केले.

425 रनवर इनिंग घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलरनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला खिंडार पाडलं आणि 99 रनवर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. मार्को यानसनने 5 विकेट घेतल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला, पुन्हा बॅटिंग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 295 रनवर ऑलआऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेने हा सामना इनिंग आणि 31 रनने जिंकला.
बऊमाने तोंड फिरवलं
या सामन्याचा शेवटचा दिवस इतका थरारक आणि टेन्शन वाढवणारा होता, याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाच्या एका कृतीवरून आला. मॅचच्या शेवटच्या दिवशी कागिसो रबाडाच्या बॉलिंगवर स्मिथने हवेत शॉट मारला यानंतर मॅथ्यू ब्रीट्झके हा कॅच पकडण्यासाठी धावला तेव्हा टेम्बा बऊमाने पाठ फिरवली आणि तो प्रेक्षकांकडे पाहू लागला, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

View this post on Instagram

 
A post shared by FanCode (@fancode)

काय म्हणाला बऊमा?
‘मी त्यावेळी खूपच नर्वस होतो. या मैदानात हवा अशी असेल तर उंच कॅच पकडणं अनेकदा कठीण असतं. कॅच पकडायला कोण जात आहे, हे मला दिसलं नाही. पण तो सामन्यातला महत्त्वाचा क्षण होता. स्टीव्ह स्मिथ किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे आपल्याला माहिती आहे. ढगही येत होते, त्यामुळे मी भावुक झालो होतो’, अशी प्रतिक्रिया टेम्बा बऊमाने दिली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर