ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

सरकारी योजनेपाठोपाठ आता मतदार यादीचा आधार, सायबर गुन्हेगारांचा मानखुर्दमध्ये डॉक्टरसोबत धक्कादायक कारनामा

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : मुंबईतून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस बिल, सरकारी योजनांपाठोपाठ आता देशभरात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्पडताळणी मोहिमेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मानखुर्द येथे राहणारे बीआरसीचे निवृत्त 70 वर्षीय डॉक्टरांची मतदार पडताळणीच्या नावाखाली तब्बल 6 लाख 71 हजार ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलिस तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार हे बीआरसी रुग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असून, पत्नीसह मानखुर्द येथे वास्तव्यास आहेत. 29 जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर मतदार यादी पडताळणी दरम्यान नाव, वडिलांचे नाव जुळत नसल्याने तातडीने संपर्क साधा, असा संदेश आला होता. त्यानंतर 30 जुलै रोजी संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर भामट्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे बनावट लिंक पाठवून फॉर्म भरण्यास सांगितले. डॉक्टर यांनी लिंकवर आधार क्रमांक, मतदार ओळखपत्राची माहिती तसेच बँक व क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर पाच रुपयांचे शुल्क भरण्याचा प्रयत्न केला. व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांना संशय आला. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यांमधून विविध व्यवहारांद्वारे मोठी रक्कम परस्पर काढली.

नागरिकांना आवाहन

घटना लक्षात घेता तक्रारदार यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. तसेच विविध मोबाईल क्रमांकावरून आलेल्या संशयास्पद संदेशांचाही तपास करण्याची मागणी केली आहे. मतदार पडताळणी, केवायसी किंवा सरकारी योजनांच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. बनावट लिंकवर क्लिक करताच खाते रिकामे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर