ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात खळबळ : मार्डी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल बंडू आत्राम (वय ३९, रा. मार्डी, ता. मारेगाव) हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात टीनच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले.

दरम्यान, ही घटना मृतकाचा मुलगा श्रेयस याच्या निदर्शनास आली. वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच त्याने तात्काळ आपल्या काकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता प्रफुल आत्राम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तात्काळ गावातील पोलिस पाटील व पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.प्राथमिक माहितीनुसार, शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मृत प्रफुल आत्राम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे मार्डी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी सागर दीपेवार व नरेंद्र तुमराम करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर