ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जबरी चोरी प्रकरणी तीन वर्षे
सश्रम कारावासाची शिक्षा.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी श्री.बी.एस.वाढई यांनी आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास तीन वर्षे ३०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दी. २०/१२/२०२२ रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
झरी तालुक्यातील पोलीस स्टेशन पाटण अंतर्गत फिर्यादि ही राहते.दि.३०.१२.२०२० रोजी फिर्यादी ही तीचे शेतात कापुस वेचण्याकरीता गेली होती दुपारी २.००वाजताच्या दरम्यान जेवण करण्याकरीता बसुन असताना मागुन आरोपी आला तो अनोळखी असल्याने फिर्यादी ही मुलाला आवाज दिला तेव्हा आरोपीने फिर्यादीस जमीनीवर पाडले व गळा दाबले व कानातील सोन्याच्या बि-या काढुन घेवुन मोटारसायकल ने पळुन गेला ही बाब समजताच पाटण पोलिसांनी पाठलाग करुन आरोपीला घटनेच्या जवळच कमळवेल्ली पुलाजवळ पकडले.

फिर्यादी ही पोलीस स्टेशन पाटणला हजर होवुन घटनेचा रिपोर्ट दिला वरुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३९२ अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश मोरे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, तपास अधिकारी यांचे सह पाच साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व ठाणेदार श्री संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी जमादार मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहीले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर