ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

21वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला.

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथे भर चौकात काल रात्री घडला थरार.

हल्ल्यात युवकाचा मृत्यू परिसरात एकच खळबळ.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे काल बाजारचा दिवस होता अशातच रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास मार्डी चौक येथे दोघांमध्ये वाद झाला व वादाचे रुपांतर शेवटी हल्यात झाले.या हल्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.ही घटना काल दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोज बुधवारला रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास घडली.

असुन मृतकाचे नाव कैलास बंडू सलाम वय सुमारे 21वर्ष रा.मजरा आहे.तर संशयित आरोपीचे नाव प्रदीप उर्फ काल्या गोविंदराव भालशंकर वय सुमारे 35 वर्ष रा.मार्डी असे आहे.प्रदीप उर्फ काल्या याचेवर कलम 302 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्डी येथे काल आठवडी बाजार होता त्या साठी कैलास हा आला होता.मार्डी येथील भर चौकात कैलास आणि प्रदीप यांच्यामध्ये वाद झाला.या वादामध्ये संशयित प्रदीप उर्फ काल्याने कैलासच्या गळ्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले.रक्ताच्या थारोळ्यात कैलास निपचित पडलेला होता.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.उपस्थित नागरिकाने याची माहिती मारेगाव पोलीसांना दिली.माहिती मिळताच पोलिसा घटनास्थळी दाखल झाले.जखमी तरुणाला जनहितच्या रुग्णवाहिकेने त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने कैलासला वणी येथील एका खासगी रुग्णलयात नेण्यात आले.मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.घटनेचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर