ब्रेकिंग न्यूज
Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video Sangli News: चुलत्याच्या गाडीखाली सापडली दोन वर्षाची चिमुकली, सांगलीत मन हेलावणारी घटना Ganpati Bappa: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? ‘ही’ कथा तुम्हाला माहितीये का? Video Bhau Gang : दोघजणं बाईकवरून आले अन् 15 राऊंड फायरिंग! जिम ट्रेनरचा जागीच मृत्यू, ‘भाऊ टोळी’च्या शार्प शूटरल…
SP News Maregaon

Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेनं आटपाडीसह सांगली जिल्हा हादरला होता. जुलै 2018 मध्ये घडलेल्या या भयंकर प्रकरणातील 70 वर्षीय नराधमाला दोषी ठरवत विटा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. शिवाजी कोंडीबा काळेल (रा. गळवेवाडी, ता. आटपाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तसेच अन्य दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देखील ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.

नेमकं प्रकरण काय?

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी परिसरातून 7 जानेवारी 2018 रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, कोणताही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदन अहवालातून भयंकर प्रकार पुढे आला. तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून खून करण्यात आला होता.

Sangli News: चुलत्याच्या गाडीखाली सापडली दोन वर्षाची चिमुकली, सांगलीत मन हेलावणारी घटना

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

चिमुकलीच्या हत्येनंतर सुरुवातीचे सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, 26 जुलै 2018 रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिवाजी काळेल विरोधात गुन्हा दाखल झाला. तपासाच्या दरम्यान पीडित मुली आणि त्यांच्या आईचे न्यायालयात कलम 164 नुसार जबाब नोंदवण्यात आले. या जबाबातूनच धक्कादायक खुलासा झाला. 7 जानेवारी 2018 रोजी घटनेच्या दिवशी आरोपी मृत मुलीसह एकत्र असल्याचे समोर आले. त्यानंतर तपासाला गती आली आणि काळेल याला चिमुकलीच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले.

नराधमाचं भयंकर कृत्य

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह घरातील लोखंडी कणगीत लपवला. त्यानंतर नातेवाइकांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक केले. त्यानंतर देखील तो पोलिसांची दिशाभूल करत होता. प्रकरणाचा छडा लावणाऱ्याला 50 हजार रुपयांची रोख बक्षीस देऊ असंही, तो सांगत होता. त्यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह घराजवळच्या जगमाईनरच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासून स्पष्ट झाले.

पोलिसांनी पकडलं कसं?

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लोखंडी कणगी आणि चादर देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आली. चादरीवर पीडित मुलीची टिकली आढळली. तिच्या आजी-आजोबांनी ही टिकली ओळखली. तसेच कोल्हापुरातील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील अहवाल पुढे आला. त्यात कणगीत मानवी रक्त आणि शरीरात देखील मानवी द्रव्य आढळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या दिशेने तपासाला गती आली.

अखेर मरेपर्यंत फाशी 

दरम्यान, न्यायालयीन सुनावणीत सगळे पुरावे महत्त्वाचे ठरले. खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 19 साक्षीदार तपासले. न्यायालयाने युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणात आरोपी शिवाजी काळेल याला दोषी ठरवले. तसेच त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तर दुसऱ्या दोन प्रकरणांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर