ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : ‘तुझ्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. त्याला महिलेपासून वेगळं करण्यासाठी होम-हवन आणि विधी करावे लागतील,” असे सांगत एका विवाहितेला जाळ्यात ओढलं. तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि पैसे उकळून तब्बल 5 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच घरात अडचणी असल्याचे सांगत उपाय करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने विवाहितेला लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातून पुढे आली आहे.

नेमकं घडलं काय?

गंगापूर तालुक्यातील भेंडाळे येथे एक 26 वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहते. सोनाली यांच्या पतीच्या मोबाइलमधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मार्च महिन्यात त्यांची कमलाकर जोशी याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला सोनाली यांनी कौटुंबिक अडचणींबाबत त्याच्याशी चर्चा केली. याचाच फायदा घेत जोशीने त्यांचा विश्वास संपादन केला.

घरातील समस्या दूर करण्यासाठी विशेष होम-हवन विधी करणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नाही, तर पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचेही सांगून सोनाली यांना मानसिकदृष्ट्या घाबरवले. या कथित विधीसाठी खर्च येणार असल्याचे सांगत त्याने वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घेतले.

लेकीला माहेरी आणत होते, काळ बनून आला कुत्रा अन् वाटेतच… माजी सैनिकाच्या मृत्यूनं छ. संभाजीनगर हळहळलं!

10 मार्च ते 1 जून 2026 या कालावधीत सोनाली यांनी जोशी आणि त्याच्या साथीदारांना 23.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे 2 लाख 35 हजार रुपये होती, तसेच 7 हजार रुपये रोख दिले. याशिवाय फोन-पे आणि बँक खात्याच्या माध्यमातून 2 लाख 58 हजार रुपये जोशीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. अशा प्रकारे महिलेची एकूण 5 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक झाली.

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून कमलाकर जोशी, त्याचा मुलगा आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे आणि पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार गणेश जाधव आणि अजितसिंग नागलोत यांच्या पथकाने कर्नाटक, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत जोशीसह तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 77 हजार रुपये रोख आणि 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेला मुद्देमाल सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी संबंधित महिलेला परत करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर