ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कत्तलीसाठी नेली जात असलेली गोवंश जनावरे पकडली; एक गाय मृतावस्थेत, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रमोद रा. मेश्राम, मारेगाव तालुका प्रतिनिधी

मारेगाव पोलिसांनी अंबेझरी शिवारात धाडसी कारवाई करत कथितरीत्या अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवंश जनावरे ताब्यात घेतली. या कारवाईत एका गायीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून जिवंत जनावरे व वाहनासह सुमारे ३ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोन जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे मारेगाव पोलिसांचे पथक अंबेझरी शिवारात दाखल झाले. तेथे उभ्या असलेल्या टाटा मॅजिक (क्र. MH-29-BE-0422) वाहनाची तपासणी केली असता चार गोवंश जनावरे अत्यंत कमी जागेत आणि आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

यातील एका गायीचा मृत्यू झालेला असल्याचे निदर्शनास आले. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.तपासादरम्यान वाहनाजवळ उपस्थित असलेल्या मंगेश सुनिल नेहारे (वय २९) व रतन गोविंदा टेकाम (वय २७), दोघेही रा. रोहपट, ता. मारेगाव यांची चौकशी करण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी अंबेझरी शिवारातील एका कोठ्यावर छापा टाकला. तेथे आणखी सहा गोवंश जनावरे आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

या जनावरांसाठीही चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले.कारवाईदरम्यान जिवंत व मृत जनावरे तसेच टाटा मॅजिक वाहन असा एकूण ३ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून जिवंत जनावरांची सुटका केली.या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 325 व 3(5), महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 मधील कलम 5 (अ), (ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कारवाई ठाणेदार सागर दानडे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. दत्तु किनाके व सागर दिपेवार यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

गोवंश जनावरांच्या कथित अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर