ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune Accident : कॉलेजला निघालेल्या ७-८ विद्यार्थिनी; बसची वाट बघत असतानाच अंगावर धावून आला काळ, भरधाव कारनं… ✦ ⚡ बुरांडा–खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका! ✦ ⚡ मार्डीच्या ‘न्यू युवा समता दुर्गोत्सव मंडळा’चा सामाजिक संदेश देणारा उपक्रम; विसर्जन मिरवणुकीतून पोलिसांच्या कार्याला सलाम! ✦ ⚡ चिंचाळ्यात ‘जय दुर्गा माता महिला मंडळा’चा विविध उपक्रमांतून सामाजिक एकतेचा जागर! ✦ ⚡ 230 झाडांची केली यशस्वी लागवड, 7 लाख रुपयांचा नफा, सोलापुरातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ✦ ⚡ सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ SA vs AUS : स्मिथचा कॅच हवेत, ब्रीट्झके धावला पण बऊमाने तोंड फिरवून हे काय केलं? आफ्रिकेच्या सनसनाटी विजयाच… ✦ ⚡ पुणेकरांच्या खिशाला कात्री, खासगी आणि स्कूल बसचा प्रवास महागणार, कितीने दर वाढणार? ✦ ⚡ दुष्काळात अमरावतीच्या शेतकऱ्यानं कमाल केली, सोयाबीनसाठी टोकण पद्धत ठरली फायद्याची, मिळालं 26 क्विंटल उत्पन्… ✦ ⚡ अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत!
SP News Maregaon

पुणेकरांच्या खिशाला कात्री, खासगी आणि स्कूल बसचा प्रवास महागणार, कितीने दर वाढणार?

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांना अधिकचे  पैसे मोजावे लागत आहेत. इतर वस्तूंच्या किमतीही वाढल्याने महागाईचा भार वाढला आहे. याचा परिणाम बस वाहतूक व्यवसायावरही होत आहे. इंधनासाठी होणारा खर्च आणि इतर खर्चात वाढ झाल्याने बस मालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी माहिती दिली.

खासगी बस आणि कारचा प्रवास महागणार?

बस आणि कारच्या भाड्यात तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या भाड्यातही वाढ करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा, सहली, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी या बसचा वापर केला जातो.

गेल्या पाच वर्षांपासून भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, या काळात वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, चालकांचे पगार, आरटीओचे फिटनेस शुल्क आणि ई-चलनाचा खर्च वाढला आहे. खासगी बस आणि कारचालकांना शासनाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. तसेच वाहनांमध्ये सुरक्षेची साधने बसवण्यासाठीही अधिक खर्च करावा लागत आहे. वाढत्या खर्चामुळे बसमालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, हा खर्च भरून काढण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी असेल भाडेवाढ…

बसच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमीटर भाडेवाढीची मागणी करण्यात आली आहे. 17 सीटर बसचे भाडे 23 रुपयांवरून 27 रुपये, तर 20 सीटर बसचे भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याची मागणी आहे. 32 सीटर बसचे भाडे 33 रुपयांवरून 38 रुपये आणि 35 सीटर बसचे भाडे 36 रुपयांवरून 42 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, 40 सीटर बसचे भाडे 41 रुपयांवरून 45 रुपये, तर 45 ते 49 सीटर बसचे भाडे 45 रुपयांवरून 55 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर