ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने मार्डी परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मच्छिंद्र येथील शेतकरी प्रताप कुमरे यांच्या शेतात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. या शिवाय तालुक्यातील काही गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे व छप्परे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त नागरिकांकडून शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे साखरा–कुंभा मार्गावर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. झाड पडून बराच वेळ उलटूनही ते हटविण्यासाठी कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर