ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

४१ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा:राधेय विद्यालयाने ‘चॅम्पियन ट्रॉफी’वर कोरले नाव..!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय, भंडारा यांच्या वतीने साकोली येथे आयोजित ४१ व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात पिंपळगाव (को.) येथील राधेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या या मेळाव्यात विद्यालयाने विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत मानाची ‘चॅम्पियन ट्रॉफी’ आपल्या नावावर केली. लाखांदुर तालुक्यातील राधेय विद्यालय पिंपळगाव/ कोहळी ​यांच्या अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर गाईड पथकाने गाईडर आर. व्हि. रोकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत आपली छाप पाडली. या पथकाने ​तंबू सजावट, ​बिन भांड्यांचा स्वयंपाक, ​लोकनृत्य स्पर्धा या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर शिवाजी महाराज स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी स्काऊटर आर. एस. परशुरामकर यांच्या मार्गदर्शनाखाली तंबू सजावट स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या सर्वांगीण कामगिरीमुळे विद्यालयाला ‘चॅम्पियन ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले. ​विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषद भंडारा येथील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शिक्षणाधिकारी, प्राथमिक ​मा. रवींद्र सोनटक्के साहेब, शिक्षणाधिकारी, माध्यमिक ​मा. मनिषा गजभिये मॅडम, जिल्हा संघटक, स्काऊट ​मा. देवेंद्र अरमळ सर ​मा. रूपाली सुर्यवंशी मॅडम जिल्हा संघटक, गाईड यांच्या हस्ते शिल्ड, मेडल आणि ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. ​समारोप प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. लोगडे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. झोडे सर आणि सेवानिवृत्त शिक्षक मा. कापगते सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर