ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड:आज सायंकाळी घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, पाहा PHOTOS

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी राजभवनातील तयारी सुरू झाली असून आज सायंकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबतच सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण गटनेतेपदाची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली असून छगन भुजबळ यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीच्या अनुषंगाने तयारी सुरू असून, सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी सुमारे 4 वाजता मुंबईत दाखल होणार असून, संध्याकाळी 5.00 वाजता शपथविधी पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, मर्यादित लोकांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. अवघ्या 10 मिनिटांत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांचा खासदारकीचा राजीनामा शनिवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर