ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मराठा तरुणांसाठी खुशखबर:स्पर्धा परीक्षा, संशोधन अन् प्रशिक्षणासाठी सारथीला 35 कोटींची आर्थिक ताकद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाने ‘सारथी’ संस्थेला तब्बल 35 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) नियोजन विभागाने जारी केला असून, या निधीमुळे स्पर्धा परीक्षा, संशोधन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेला आर्थिक वर्ष 2025-26 साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सारथी संस्थेबद्दल… पुणे येथील सारथी संस्था ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम ही संस्था करते. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती तसेच इतर शासकीय सेवांच्या परीक्षा यांचा समावेश आहे. याशिवाय संशोधन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाशी संबंधित अनेक योजना देखील राबवल्या जातात. 35 कोटींपेक्षा अधिक निधीचा होणार वापर शासन निर्णयानुसार, मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राखीव असलेल्या तरतुदीतून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकूण 35 कोटी 34 लाख 23 हजार रुपये सारथी संस्थेला वितरित करण्यात येणार असून, त्यातून विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना आणि उपक्रम राबवले जाणार आहेत. मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील काही कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सारथीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. निधी खर्चासाठी घालण्यात आल्या अटी सरकारने निधी मंजूर करताना त्याच्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करूनच निधी खर्च करावा, कोणतीही आर्थिक अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि खर्चानंतर उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत.या सर्व प्रक्रियेची जबाबदारी सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सोपवण्यात आली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना मिळणार बळ राज्यातील अनेक मराठा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या संधींसाठी सारथीवर अवलंबून आहेत. नव्याने मंजूर झालेल्या निधीमुळे प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार, नवीन शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन प्रकल्प आणि विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर