ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी मजबूत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, मराठी माणसांचा आवाज म्हणून एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, सरसकट कर्जमाफी म्हणजे काय जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना कर्जमाफी करायची का? सरसकट कर्जमाफीची व्याख्या ठरली पाहिजे. तुम्ही काय आमदार-खासदार आणि उद्योगपतींना कर्जमाफी देणार का? त्यांना सोडून कर्जमाफी करावी लागेल. ती यादी तयार करावी लागेल. शेतकऱ्यांची वर्गवारी केली पाहिजे. यामध्ये बिल्डर शेतकरी, व्यापारी शेतकरी, अधिकारी शेतकरी, लोकप्रतिनिधी शेतकरी, लेआऊट धारक शेतकरी बाजूला काढत खऱ्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो बच्चू कडू म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल सांगता येत नाही. इथे कोणी कायम मित्र आणि शत्रू नसते. एकत्र शिवसेनेत राऊत चालतील का या प्रश्नावर बोलताना कडू यांनी असे म्हटले आहे. विनाकारण करतात त्यालाच राजकारण म्हणतात. शिवसेना एकत्र यावी अशी प्रार्थना आम्ही आई भवानीकडे करू असेही त्यांनी म्हटले आहे. राऊतांची गत आसाराम बापूंसारखी बच्चू कडू म्हणाले की, संजय राऊत हे जर कमी बोलले असते तर आज वेगळे चित्र राहिले असते. ते अधीक बोलले आणि काम काहीच केले नाही. लाख बोलण्याहून थोर, एकच माझा कर्तबगार, कर्तबगारी फार महत्त्वाची असते. आसाराम बापूची तुकराम महाराज यांच्याशी कधीही तुलना होऊ शकत नाही. तुकराम महाराज यांच्या कामात राम होता. ते कर्तृत्वातून समोर आले होते. आसाराम बापू सारखी राऊतांची गत आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात बच्चू कडू म्हणाले की, पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरले गेले तर ते पीक हाती येते पण आता त्यासाठी उशिरा झाला आहे. आता कोणते पीकं घ्यावे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी काही भेटेल का अशी आशा शेतकऱ्यांची सरकारकडून आहे. मी कालसुद्धा या विषयासंदर्भात सभागृहात बोललो. सत्ता कुणाचीही असो शेतकरी डोक्यातून जाणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर