ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

उन्हाळ्यात 220 आगीच्या घटना; शहरात केवळ 4 अग्निशमन केंद्र:इमारती 16 माळ्यांच्या, शिडी चार ते पाच माळ्यांपर्यंत पोहोचेल इतकीच‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहराची लोकसंख्या, इमारती, घरे, दुकाने, बाजारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सध्या तर सूर्य आग ओकत असल्याने शहर जणू आगीच्या उंबरठ्यावरच उभे आहे की, काय असे वाटत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात २०० हून अधिक लहान, मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरात बहुमजली इमारतींचीही संख्या वाढत आहे. अशात महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ना पुरेशी परिणामकारक यंत्रणा आहे, ना मनुष्यबळ. आश्चर्याची बाब म्हणजे चार मजली इमारतीला जर आग लागली तर तेथवर पोहोचेल एवढी उंच शिडीही अग्निशमन विभागाकडे नाही. त्यांच्याकडे दोन ते तीन मजली इमारतीपर्यंत पोहोचेल एवढीच शिडी आहे. शहरात मोठे मॉल्स, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रुग्णालये, हॉस्पीटल्स वाढत असताना मनपाच्या अग्निशमन विभागाकडे एकूण २८ वाहने आहेत. त्यांचा वापर करून अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करीत आहे. मात्र, मनपा प्रशासन अग्निशमन यंत्रणा बळकट करण्याबाबत काहीसे उदासीन दिसत आहे. एकप्रकारे सध्या वेळ निभावून नेण्याचे काम सुरू आहे. ही बाब एखादवेळी धोकादायक ठरू शकते. सुमारे १० लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ चार अग्निशमन केंद्र असून मागील तीन वर्षांपासून ३ अग्निशमन केंद्र प्रस्तावितच आहेत. त्यांचे काम अजुनही पूर्ण झाले नाही. मल्टी युटिलिटी रेस्क्यू वाहन तर पांढरा हत्ती ठरले असून ३ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलेले हे वाहन कुचकामी आहे. फायरमनची आवश्यकता असली तरी सध्या केवळ २ फायरमनच्या आधारे वेळ निभावून नेली जात आहे. मनपाच्या बडनेरा, प्रशांत नगर, ट्रान्सपोर्ट नगर व अग्निशमन मुख्यालय अशा चार केंद्रांवर एकूण ११८ स्थायी व कंत्राटी कर्मचारी कार्यरत असले तरी अजुनही ८० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ^ इमारतींना फायर एनओसी दिली जाते त्यावेळी त्यांच्याकडे सक्षम अग्निशमन यंत्रणा आहे की, नाही याबाबत पूर्ण शहानिशा केली जाते. – अजय पंधरे, अग्निशमन अधीक्षक, अमरावती. फायर फोम टेंडर १५ बचाव व्हॅन ३ फायर बुलेट २ टाटा योद्धा ३ टाटा ४०७ १ पाण्याचे टँकर ३ शहरात दिवसेंदिवस उंच इमारतींची संख्या वाढत असून अपार्टमेंट, मॉल, मल्टीस्टोरी बिल्डिंग वाढत आहेत. अशात अग्निशमन विभागाकडे मात्र ४५ फुट उंचीपर्यंत पोहोचेल इतपत अर्थात दोन ते तीन मजले उंचीपर्यंत पोहोचेल एवढीच शिडी आहे. त्यामुळे भविष्यात चौथ्या, पाचव्या मजल्यावर आग लागली तर अग्निशमन विभाग काय करणार असे विचारले असता जवानांना पायऱ्यांवरून चढून जावे लागेल, असे सांगण्यात आले. तसेच या इमारतींमध्ये जी अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात असेल तिचा वापर केला. यंत्रणा वाढवण्याची आहे गरज शहरात मनपा क्षेत्रात आगीच्या लहान, मोठ्या २२० घटना घडल्या आहेत. तसेच वर्षभरात एकूण ३३० च्या वर आगीच्या घटना घडल्या. शहराचा आकार वाढत असला तरी अग्निशमन यंत्रणा मात्र वाढवण्यात आली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाकडे असलेली यंत्रणा तपासूनच उंच इमारतींना एनओसी अग्निशमन विभागाकडे ४५ फुटापर्यंत एवढीच शिडी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर