ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

आई – बहिणीवरून शिवी दिली तर 500 रुपये दंड:सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 100 रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी कोळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी गावातील सामाजिक वातावरणाबाबत चर्चा करत महिलांचा अपमान करणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दंडासाठी व्हिडिओ पुराव्याची अट या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडिओ पुराव्याची अट ठेवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्याच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. या ग्रामसभेत गावाच्या स्वच्छतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गावातील घर, दुकान किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास संबंधित व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य या ग्रामसभेस सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस एस कवडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, आशासेविका आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. पुढील वर्षी महिला दिन आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शकुंतला देशमुख यांनी महिलांच्या एकजुटीचे कौतुक करत, गावात सन्मान आणि संस्कार जपण्याचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर