ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nanded Crime News : गेल्या काही महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच नांदेड सारख्या शहरात देखील गुन्हेगारांनी हातपाय पसरले आहे. नांदेडमध्ये गँगवॉरने डोकं वर काढलं असून याच टोळीयुद्धाच्या वादातून दुध डेरी परिसरातील एक पेट्रोल पंपावर एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंद्रजीत सिंग बावरी असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आता नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
खंजिराने वार करत पळ काढला
इंद्रजीत सिंग बावरी हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना तीन ते चार जणांनी त्याचा हल्ला करत खंजिराने वार करत पळ काढला. इंद्रजीत सिंग बावरी हा हिस्ट्री सीटर आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं ही हत्या गॅंगवर मधूनच झाली असावी, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे. आरोपी इंद्रजीतवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसले होते. त्यांनी इंद्रजीतचा पाठलाग केला अन् त्याच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर आरोपी पेट्रोल पंपावरून फरार झाले.

CRIME : खुनाचा बदला खून? जेलमधून बाहेर आलेल्या 20 वर्षाच्या प्रतीक निर्घृणपणे हत्या, सिम्बायोसिस कॉलेजच्या मागच्या जंगलात काय घडलं?
दूध डेरी परिसरात मोठी खळबळ
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतच पोलिस अधीक्षक नीलभ रोहन यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळं मात्र दूध डेरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शहरातील बाफना परिसरात एका अज्ञाताचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची देखील घटना समोर आली आहे.
डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, बाफना परिसरातील एका ऑटोमोबाईल्स दुकानासमोर 30 ते 35 वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. अज्ञात हल्खोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आलं होतं. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस त्याची माहिती मिळवत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर