ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये काही वेळ भीती आणि दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. सध्या या संपूर्ण घटनेशी संबंधित एक अत्यंत थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमके घडले काय?
सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, दोन महिला, एक पुरुष आणि लहान मुलगा असे एकूण चारजण एका इमारतीच्या लिफ्टमधून वरच्या मजल्याच्या दिशेने जात असतात. लिफ्ट सुरळीत सुरु असतानाच अचानक इमारतीला तीव्र हादरे बसू लागतात, त्यामुळे लिफ्टमध्ये असलेले सर्वजण प्रचंड घाबरुन जातात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांना नेमकं कशामुळे घडलं ते समजू शकलं नाही.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, अवघ्या काही क्षणांच्या अंतराने त्यांना सलग दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. अचानक आलेल्या या सर्वजण पूर्णपणे घाबरलेले दिसतात. मात्र सुदैवाने त्या वेळी कोणतीहा अपघात आणि जीवतहानी झाली नाही.

अधिकृत नोंदीनुसार, नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये 8 ऑगस्ट 2026 रोजी साधारण 10 वाजण्याच्या दरम्यान ( 22:00:59 IST) भूकंपाचे हे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रकडील आकडेवारीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजली गेला आहे तर मेरी नाशिक येथून मिळालेल्या माहितीनुसार याची तीव्रता ही 4.1 मॅग्निट्यूज इतकी नोंदवली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदु हा जमिनीखाली अवघ्या पाच किलोमीटर खोलीवर होता, ज्यामुळे हादरे इतक्या तीव्रतेने जाणवले.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
भूकंपाच्या या धक्क्यांमुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,अशी माहिती समोर येत आहे. मात्र, असे असले तरी कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर