ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शेवगावच्या विकासासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे मंत्रालयात‎:उपमुख्यमंत्री शिंदेंकडे व्यापारी संकुलासह विविध निधींची मागणी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेवगाव शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री दादा भुसे उपस्थित होते. भेटीदरम्यान पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेवगाव शहरातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावणे, रस्ते, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळातील शहराचा विस्तार लक्षात घेऊन नवीन विकास प्रकल्पांना मंजुरी देणे आणि सार्वजनिक सुविधांचा दर्जा सुधारण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. शहरातील स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शेवगावमध्ये एक आधुनिक व भव्य व्यापारी संकुल उभारण्यात यावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विशेष मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवगावच्या विकास प्रस्तावांवर सकारात्मकता दर्शवली असून, शहरासाठी आवश्यक तो सर्व सहकार्य व निधी देण्याचे आश्वासन दिले. शहराला आधुनिक रूप देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा अरुण मुंडे यांनी निर्धार केला. शेवगावचा सर्वांगीण विकास, जनतेचा विश्वास आणि विकासासाठी अखंड प्रयत्न हेच आमचे ध्येय आहे. शहराला आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी माझा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असे अरुण मुंडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कामांबाबत चर्चा करताना अरुण मुंडे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर