ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मान्सूनला दृष्ट लागली:इतिहासातील दुसरा सर्वात कोरडा जून संपत आला, जून 2009 मध्ये सरासरीपेक्षा 49 %, तर यंदा जूनमध्ये 42.2% तूट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत मान्सूनचा पाऊस पडू शकेल. दरम्यान, पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात कोरडा जून महिना संपत आहे. यापूर्वी २००९ मध्ये संपूर्ण जूनमध्ये सरासरीपेक्षा ४९% कमी पावसाची नोंद झाली होती. २१ जूनपर्यंत देशात सरासरी ९९.२ मिमी पाऊस व्हायला हवा होता, पण ५७.४ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच ४२.२% तूट आहे. दुसरीकडे, मुंबई, पुण्यात रविवारी पूर्वमोसमी रिमझिम पाऊस झाला. कमकुवत मान्सूनमुळे पेरणी क्षेत्र घटले पेरणी प्रभावित : १२ जूनपर्यंत एकूण खरीप पेरणी वार्षिक आधारावर ३.९% घटून ८४.६ लाख हेक्टर राहिली.
पिकांवर परिणाम : डाळींचे क्षेत्र ४३.२% आणि कापसाचे २८% घटले. मात्र, भात पेरणीत २८.४% वाढ नोंदवली गेली. दिलासा : जलाशयांची पाणीपातळी क्षमतेच्या २८.३% आहे. (सिंचनासाठी बफर).
आशा : देशात ढग दाटताहेत

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर