ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय?

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी असणाऱ्या शहरांत पुणे पाचव्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव नुकतेच एका सर्व्हेतून पुढे आले. ही कोंडी सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर देखील मोठे प्रयत्न होत आहेत. पाषाण, पंचवटी आणि कोथरूडदरम्यान एका खास प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत असून त्यामुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होईल. विशेष म्हणजे पुण्यातील हा पहिलाच रस्ता बोगदा प्रकल्प असेल.

पुण्यातील पहिला शहरी रस्ता बोगदा प्रकल्प पाषाण-पंचवटी-कोथरूडदरम्यान होत होणार आहे. 3 किलोमीटर लांबीच्या या बोगदा प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या बोगद्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासाठी पुणे महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. या नियुक्तीनंतर प्रकल्पाचा तांत्रिक अभ्यास करण्यात येऊन आराखडा निश्चित करण्यात येईल.

Weather Alert: अख्ख्या महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक, पण 4 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, आजचं हवामान अपडेट

40 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत

पाषाण-पंचवटी-कोथरूड बोगदा प्रकल्पामुळे गर्दीच्या वेळेत पाषाण ते कोथरूड प्रवास सोपा होईल. 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पाषाण, पंचवटी आणि कोथरूड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे पाषाण ते कोथरूड मार्गावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यामुळे हा बोगदा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर हा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

सल्लागाराची नेमणूक

बोगदा प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या या प्रस्तावित मार्गाचे अलाइनमेंट प्राथमिक स्वरुपात असून अंतिम आराखड्यात बदलांची शक्यता आहे. बोगद्यांचे बांधकाम, भूसुरक्षा, जमिनीची स्थिती, सेवा वाहिन्या, प्रवेश आणि निर्गम मार्ग, वाहतूक व्यवस्थापन याचा अभ्यास प्रकल्प सल्लागाराकडून करण्यात येईल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर