ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर

13 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Ravindra Jadeja Mimics Kuldeep Yadav : कोलंबो येथे श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केल्याचं पहायला मिळालं. देवदत्त पेडिक्कलच्या शतकानंतर आता गुरनूर ब्रार याने चार सिक्स मारले अन् गंभीरला देखील चकित केलं. अशातच आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधला व्हिडीओ समोर आला असून यामध्ये गंभीर खळखळून हसत असल्याचं दिसून आलं. रविंद्र जडेजाने असं काय केलं? त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
जडेजाच्या मिमिक्रीवर हसू आवरलं नाही
श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाच्या विनोदी शैलीमुळे मैदानावर आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. डगआऊटमध्ये उपस्थित असलेले प्रशिक्षक गौतम गंभीर याला जडेजाच्या मिमिक्रीवर हसू आवरलं नाही. रविंद्र जडेजा बॅटिंगला जाण्याआधी गंभीरसोबत डगआऊटमध्ये उभा होता. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा देखील सुरू होती. अचानक जडेजाने कुलदीप यादवच्या गोलंदाजीच्या शैलीची आणि चेहऱ्यावरील हावभावांची नक्कल केली, तेव्हा त्यांना हसू आवरता आलं नाही.

#1 All-rounder for a reason.
Ravindra Jadeja can bat, bowl, field, and apparently, crack Gautam Gambhir too.

Watch Day 3 of SLC XI vs #TeamIndia tomorrow, 10 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/TWbJzVPEed

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 8, 2026

सुदर्शनच्या जागेवर देवदत्त पडिक्कल खेळणार
यशस्वी जयस्वाल एकही रन न काढता आऊट झाल्याने भारताची सुरुवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. राहुल 40 धावांवर बाद झाला, पण पडिक्कलने आपली जागा टिकवून ठेवली. त्याने 164 चेंडूंमध्ये 142 धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपताना तो नाबाद राहिला. त्यामुळे आता साई सुदर्शनच्या जागेवर देवदत्त पडिक्कल खेळणार हे पक्कं झालंय. साई सुदर्शन दुखापतीमुळे सिरीजमधून बाहेर झाला आहे.
गुरनूर ब्रारने कमाल केली…
केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावा जोडून डाव सावरला. राहुलने 67 बॉलमध्ये 40 धावा केल्या. त्यानंतर जडेजा मैदानात आला अन् त्याने 63 धावांची खेळी केली. पण ऋषभ पंत आणि ध्रुव जुरैल यांना मैदानात जास्त वेळ टिकता आलं नाही. दोघंही स्वस्तात परतले. त्यानंतर गुरनूर ब्रारने मात्र कमाल केली. त्याने एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स मारले अन् मॅच श्रीलंकाच्या हातातून काढली. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी टीम इंडिया पुन्हा बॉलिंग करण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर