ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Vansh Bedi Viral Video : क्रिकेटला भारतात एक धर्म मानला जातो. या धर्माची पुजा करण्यासाठी खेळाडू अहोरात्र मेहनत करतात. गल्ली क्रिकेटमधून जिल्हापातळीवर खेळतात, नंतर राज्यच्या टीममध्ये अन् नंतर क्रिकेट लीगमध्ये आपलं नशीब आजमवतात. पण त्यातीत खूप कमी जणांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते. अशातच आता दिल्ली प्रिमियर लीगमध्ये धमाकेदार सामने पहायला मिळत आहे. अशातच याच लीगमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. सीएसकेच्या स्टार खेळाडूने ओम नम: शिवायचा जाप करत मैदानात तांडव घातला अन् टीमला मॅच जिंकून दिली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
220 धावांचा डोंगर उभा केला अन्…
यश धुळीच्या कॅप्टन्सीखाली खेळणाऱ्या सेंट्रल दिल्ली किंग्जने दिल्ली प्रीमियम लीग 2026 मधील 19 व्या या थ्रिलर मॅचमध्ये 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दोन्ही टीम्सच्या बॅटर्सनी दमदार बॅटिंग करत धावांचा पाऊस पाडला. पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्झच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 220 धावांचा डोंगर उभा केला. 221 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट्रल दिल्ली किंग्ज शेवटच्या ओव्हर्समध्ये अडचणीत आली होती. त्यानंतर वंश बेदी मैदानात आला अन् पठ्ठ्यानं अशक्य अशी कामगिरी करून दाखवली.

IND vs SL : एक जागा अन् तीन प्लेयर्स! सरफराजच्या एन्ट्रीने गंभीरची डोकेदुखी वाढली, कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
ओम नम: शिवायचा जप करत मॅच जिंकवली
शेवटच्या ओव्हर्समध्ये मॅच अत्यंत रोमहर्षक वळणावर पोहोचली होती. वंश बेदीने नाबाद 16 धावा करत टीमला विजयाच्या पार नेलं. यावेळी त्याने ओम नम: शिवायचा जप करत टीमला विजय मिळवून दिला. सेंट्रल दिल्ली किंग्जने 19.4 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 222 धावा पूर्ण करत विजय साकारला. दक्षिण दिल्लीच्या अंशुमान हूडाने 3 विकेट्स घेतल्या, परंतु तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही.

View this post on Instagram

A post shared by Delhi Premier League T20 (@delhipremierleaguet20)

कोण आहे वंश बेदी?
उत्तराखंडमधील अल्मोरा येथील रहिवासी असलेला वंश देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. दिल्ली प्रीमियर लीगमधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर त्याला लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर आयपीएल 2025 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याला संघात घेतलं. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच वंशला टीम इंडियाचा भावी स्टार खेळाडू म्हणून ओळखलं जातंय. वंश बेदीचा जन्म 23 डिसेंबर 2002 रोजी झाला असून तो सध्या 24 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयातच त्याने व्यावसायिक क्रिकेट कारकीर्द घडवायला सुरुवात केली होती. आता तो दिल्ली प्रिमियर लीगमध्ये तांडव घातलाना दिसतोय.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर