ब्रेकिंग न्यूज
Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला!
SP News Maregaon

मराठी प्राध्यापक परिषदेचे ३९ वे अधिवेशन झरी-जामणी येथे उत्साहात संपन्न

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी-जामणी

झरी-जामणी पेंनगंगा एज्युकेशन सोसायटी, पाटण संचलित आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, झरी-जामणी येथे मराठी प्राध्यापक परिषदेचे ३९ वे अधिवेशन शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने केलेली शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्तापूर्ण कार्य अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवले.

महाविद्यालयाचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय वामनरावजी  कासावर साहेब आणि प्रविणभाऊ कासावर यांच्या खंबीर मार्गदर्शनामुळेच हे महाविद्यालय आज शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून, संस्थेने ‘NAAC’ कडून B++ मानांकन प्राप्त करून आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. या यशामध्ये प्राचार्या डॉ. राखी ना. देशमुख यांचे नेतृत्व मोलाचे ठरले असून त्यांनी संपूर्ण अधिवेशनाच्या नियोजनाला प्रभावी दिशा दिली.


अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात प्रा. डॉ. गजानन हेरोळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर उद्घाटक म्हणून मा. श्री. वामनरावजी कासावर साहेब उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत मा. श्री. प्रविणभाऊ वा. कासावर, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, प्राचार्य डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, प्रा. डॉ. प्रशांत विघे,

प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे,डॉ. दिलीप अलोने आणि प्रा. अतुलकुमार सारडे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे संवर्धन, तिचे शैक्षणिक महत्त्व आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यावर विचार मांडले.

अधिवेशनातील शैक्षणिक सत्रांचे नियोजन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. आस्तिक गोवारकर यांनी विषयांची योग्य निवड, तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन आणि सत्रांचे सुसूत्र आयोजन यामुळे अधिवेशनाला बौद्धिक उंची प्राप्त करून दिली. विविध सत्रांमधून मराठी भाषेचे विज्ञान व वाणिज्य क्षेत्रातील स्थान, तसेच अभ्यासक्रमातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी यावर सखोल चर्चा झाली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन IQAC-Coordinator प्रा. प्रणव टी. भोयर यांनी काटेकोरपणे राबवले. त्यांच्या व्यवस्थापनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि गुणवत्तापूर्ण आयोजनाची खात्री झाली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी “माझे महाविद्यालय, माझा अभिमान” या भावनेने कार्य करत अधिवेशन भव्य आणि यशस्वी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक डॉ. आस्तिक गोवारकर यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले. एकूणच, हे अधिवेशन मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरले असून सहभागी प्राध्यापकांना नवीन दिशा आणि उर्जा देणारे ठरले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर