ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

झरी तालुक्यात पावसाची  रिमझिम कायम ११ व १२ दमदार पावसाची हजेरी.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आजपर्यंत ३७७ मी.मी पावसाची नोंद
आज पावसाचा जोर कायम , नदी -नाल ओव्हर फ्लो ,  गावचा संपर्क तुटण्याची शक्यता.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:- हवामान खात्याचा अंदाज चुकतात मृग व आर्दा ही पावसाचे  दोन नक्षत्र कोरडी गेली . काही ठिकाणी तुरळ व अनियमित पावसाने कपासीची दुबार तिबार टोबणी करण्याची वेळ बळीराजावर आली.दमदार पाऊस व्हावे या साठी देवाकडे साकडे घालण्यात आले.परंतु जुलै महिना सुरू झाला आणि पावसाचा जोर हळू हळू वाढला गेला.१० ११ व १२ तारखेला पावसाने चांगलेच झोडपून काढले.नदी नाले तुडुंब भरून वाहायला लागले.

रात्रंदिवस पडलेल्या पावसाने नदी व नाल्याला आलेल्या पुराने गावाचा संपर्क तुटला.पैनगंगा व खूनी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदी जवळील गावांना प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या पावसाच्या पुराचे  पाणी घरात शिरल्या ने घरची पडझड झाली आहे.अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने  कोवळ्या पिकं सडून गेले आहे.घोन्सा येथे वेकोली च्या खुल्या खाणीच्या माती ढिगार्‍याला विदर्भ नदीचे पाणी अडल्याने गावातील आठवडी बाजार परिसरात पाणी शिरले तसेच हनुमान मंदिराच्या पायऱ्यांपर्यत पाणी आले होते.

झरी मधून जाणाऱ्या नाल्याचे पाणी अरुंद पुलाला अडल्याने  काही दुकानात जाऊन अनेक व्यवसायीकांचे नुकसान झाले आहे .गेल्या दहा दिवसा पासून शेतीच्या कामाचा खोळंखा झाला आहे डवरणी ,निंदण  ,फवारणी खत व्यवस्थापन इ. कामे थांबले असून शेतात तणाचा वाढ झाली आहे . त्यामुळे निंदन खूरपण व तणनाशकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे .

प्रतिक्रिया…
झरी  तालुक्यात मुख्यालयात ८२ मी. मी . पाऊस पडला आहे . आजपर्यंत एकूण पाऊस ३७७ मी.मी .जिवित हानी झाली नसली तरी दोन बैलाचा पुराणे वाहत जावून मृत्यू झाला . ३७ घराचे अंशतः नुकसान झाले . १३२० .०० अंदाजे हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती तहशील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर