ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज्यमार्ग ३१५ ते मांडवी – पिवरडोल रस्त्यावरील पुलांची होणार पुनर्बांधणी.

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सभापती राजेश्वर लक्ष्मणराव गोंड्रावार यांच्या पाठपुराव्याला यश.

नाबार्ड किंवा दुसऱ्या योजनेमधून करण्याच्या लोकप्रतिनिधी व प्रशासन कडे प्रस्ताव.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्याला लागून असलेल्या पाटण -बोरी ठिकणी गवरा,पिवरडोल मांडवी इ. गावतील विद्यार्थी शाळा महाविद्यालयात शिक्षण घेतात.बॅक व्यवहार दवाखाना ,बाजारपेठ इ. कामा करिता या ठीकाणी यावे लागते.परंतु पाटणबोरी आणि मांडवी या दोन गावातून वाहत असेल्या खूणी नदी वर बांधण्यात आलेला पूल अरुंद व खूप कमी उंचीचा आहे.त्यामुळे छोट्या मोठ्या पावसात पूल पुराच्या पाण्याखाली जातो परिणामी वाहतूक बंद होते.

गेल्या वर्षी हा पूल अनेकदा पाण्याखाली आल्याने वाहतूक बंद होती.यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जिल्हाधिकारी,यांची तहसिल कार्यालय,झरीजामणी येथील आढावा सभेत तसेच आमदार बोदकुरवार यांचे पं.स. झरी जामणी येथील दिनांक ०४.०३.२०२३ रोजीचे आढावा सभा मधील उपस्थीत पंचायत समिती झरी चे माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी मांडवी आणि चाटवण नाल्या वरिल पुलांची कमी व गवारा पर्यत रस्ता रुंदीकरण विषय आढावा बैठकीत मांडला होता.

त्या अनुषंगाने राज्यमार्ग ३१५ (बोरी) मांडवी-पिवरडोल रस्ता, इ.जि.मा. १३६ दर्जाचा असुन त्याची लांबी ७.५० कि.मी.आहे.या लांबीमध्ये ०/९०० मध्येखुनी नदीवर १० स्पॅनचा आर्च ब्रिज आहे.या पुलाची लांबी ७५ मीटर असून रुंदी फक्त ४.७५ मीटर आहे.सध्याच्या वाहतुकीसाठी ही रुंदी खुप कमी पडते.त्यामुळे या पुलावर कधीही अपघात होवु
शकतो.तसेच या पुलाची उंची ही कमी आहे.

त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात बरेचवेळा या पुलावरुन पाणी वाहते व वाहतुक खंडीत होते.त्यामुळे या पुलाऐवजी नविन पुल बांधने आवश्यक आहे.सन २०२३ च्या पावसाळयात दोन दिवस हा मार्ग बंद होता.तसेच या रस्त्यावर २/१०० मध्ये स्थानिक चाटवन नाल्यावर आर्च ब्रिज आहे.य पुलाची लांबी ६० मीटर असुन,रुंदी ४.७५ मिटर आहे.

सद्यस्थितीतील वाहतुकी करीता या पुलाची रुंदी पुरेशी नाही.तसेच या पुलाची उंची ही कमी आहे. त्यामुळे पावसाळयात दरवर्षी बरेच वेळा या पुलावरुण पाणी जावुन वाहतुक खंडीत होते.त्यामुळे या पुलाऐवजी नविन ‘पुल बांधने आवश्यक असाल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय महामार्ग पासुन झरी तालुक्याला जोडनारा हा पर्यायी मार्ग असून,सद्यस्थितीत या रस्त्यावर खुप वाहतुक आहे.त्यामुळे या पुलांची पुनबांधनी करने आवश्यक आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाला मिळनारा अत्यल्पनिधी विचारात घेता ही कामे जि.प.मार्फत होने अशक्य आहे.तरी कृपया ३१५ (बोरी) मांडवी पिवरडोल रस्ता इ. जि.मा. १३६ वरील पुलांची कामे नाबार्ड किंवा इतर निधीतून करण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या पाठविण्यात आला असून यामार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर